आमदार नारायण पाटलांना धक्का, बंधू विलास पाटील शिंदे गटाच्या गळाला

करमाळा – आगामी करमाळा कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूक जाहीर होण्याअगोदरच शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांना जोरदार धक्का बसला असून त्यांचे चुलत बंधू आणि विलास पाटील हे सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्या गळाला लागले असून लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

सोमवार १३ ऑगस्ट करमाळा तालुक्यातील जेऊर येथे विलास पाटील प्रवेश करणार असून होणार असून याच दिवशी करमाळा तालुक्यातील अनेक गावांतील कार्यकर्ते देखील शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत.

आमदार नारायण पाटील यांचे बंधू विलास पाटील हे २००७ साली राष्ट्रवादीकडून करमाळा पंचायत समितीवर निवडून आले होते.

नारायण पाटील आणि विलास पाटील यांच्यात मागील काही दिवसांपासून बऱ्याच मुद्द्यांवरून मतभेद निर्माण झाले होते.अखेर विलास पाटील यांनी नारायण पाटील गटाला राम राम ठोकण्याचा इरादा बनवला. आमदार पाटील यांच्यासाठी हा अत्यंत मोठा धक्का मानला जात असून विलास पाटील यांच्या प्रवेशामुळे शिंदे गट तालुक्यात बळकट होईल अशी शक्यता आहे. आगामी मार्केट कमिटीच्या निवडणुकीत विलास पाटील यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपविण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

उद्याची सकाळ शेकापचीच !

मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामे ही स्टंटबाजी ?