फसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला

blank

टीम महाराष्ट्र देशा- मोहोळ तालुका हा पुरोगामी विचाराचा तालुका आहे या तालुक्यातील जनता सुज्ञ आहे त्यामुळे येणारी विधानसभा मा. शरद पवारसाहेबांची पुरोगामी झेंड्याची आणि समतेची पताका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस राजन पाटील यांच्या नेतृत्वात मोहोळ विधानसभा लढणार आणि जिंकणार असा विश्वास जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळराजे पाटील यांनी व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी लोकनेते साखर कारखान्यावर प्रतिक्रिया दिली.

तालुक्यात छोट्या मोठ्या आघाड्यांच्या माध्यमातुन राष्ट्रवादीच्या विरोधात षडयंत्र आखले जात आहे , गेटकेन पुढाऱ्यांना तालुक्याच्या भल्याची आठवण झाली आहे, शिवसेनेला फसवुन , भाजपा ला फसवुन त्यांच्या कार्यकर्त्याचा वापर करून तालुक्यात निर्माण झालेली ही आघाडी आहे व्यक्तीद्वेषातून झालेली ही सर्वपक्षीय आघाडी तालुक्यातील शेतकरी आणि जनतेचे किती भलं करणार ? हे मी सांगण्याची गरज नाही , त्यामुळे लोकहिताचं व्हिजन नसणारी लोकं इस्ट इंडिया कंपनी प्रमाण ब्रिटीश नीती वापरत आहेत त्यामुळे फसव्या लोकांना जनतेने कुठे ठेवायच हे ठरलेल आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

गत जिल्हा परिषद, पं.समीतीमध्ये सर्व विरोधकांनी आघाडी उभा केली होती परंतु राजन पाटलांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे मताधिक्य वाढलेच, गेटकेन पुढारी हे पुतना मावशी प्रमाणे तालुक्याच्या भल्याचा आव आणतात त्यामुळे जनता आता हुशार आहे आणि तालुक्याच नेतृत्व तालुक्याचा विचार करण्यासाठी राजन मालकच पाहिजेत म्हणुन निवडणुक हातात घेऊन राष्ट्रवादीला वाढीव मताधीक्य दिले असा दावा पाटील यांनी केला.

मोहोळ तालुक्यातील जनता हि विकासाच आणि स्थिरतेचं व्हिजन असणाऱ्या नेत्याच्या मागे चालते , त्यामुळे येणाऱ्या काळात विधानसभेमध्ये आमदार गेल्यावेळीपेक्षा अधिकाधिक मताधिक्याने पाठविणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले