‘आणि तो मिस्ड कॉल शेवटचा ठरला ‘ ; पुष्कर जोगने सांगितला भावुक प्रसंग

पुष्कर जोग

मुंबई : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेकांना आपल्या जवळील व्यक्तींना गमवावं लागलं आहे. तर, बड्या नेत्यांसह अनेक कलाकारांचा देखील कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या थैमानामुळे चिंताजनक वातावरण निर्माण झालं आहे.

सर्वत्र नकारात्मक वातावरण दिसत आहे. त्यामुळे एकमेकांना आपलुकीच्या दोन शब्दांची गरज आहे. असाच काहीसा अनुभव अभिनेता पुष्कर जोगला आला आहे. पुष्करने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर करत आपल्यासोबत आलेल्या एका अत्यंत वाईट अनुभवाचा खुलासा केला आहे. त्याचबरोबर त्याने एक महत्वाचा संदेश देखील दिला आहे.

अभिनेता पुष्कर जोगने नुकताच आपल्या मामांला गमावलं आहे. काही दिवसांपूर्वी पुष्करला त्यांचा कॉल आला होता. मात्र काही कारणामुळे त्याला तो कॉल घेता आला नाही. आणि पुन्हा कामात कॉल करायचा राहून गेला. आणि त्याच्या पुढच्याच दिवशी पुष्करला समजलं की त्याचा मामा गेला. असा हा अत्यंत भावनिक प्रसंग पुष्करने आपल्या चाहत्यांसोबत शेयर केला आहे. पुष्करने अत्यंत भावुक होतं म्हटलं आहे, कृपा करून आपल्या जवळच्या लोकांचा, मित्रांचा फोन अजिबात टाळू नका. असे भावनिक आवाहन देखील त्याने केले आहे.

व्हिडीओ सोबत त्याने एक पोस्ट देखील शेअर केली आहे. त्यात त्याने असे म्हंटले आहे कि, ‘मी व्यक्त होण्याचा विचार करत होतो आज थोडी हिम्मत झाली .काही दिवसांपूर्वी माझा मामा गेल्याचा पोस्ट मी टाकला होता त्या वेळेस चा मिसड कॉल माझे मन अजून हि खात आहे .. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे कृपा करून एकमेकांच्या संपर्कांत रहा .लॉकडाऊन असल्या मुळे सर्वांशी संपर्क होत नाहीये हे योग्य नाही . हा काळ आपल्या सर्वांसाठी प्रचंड कठीण आहे तेव्हा हेवे दावे , रुसवे फुगवे , वैचारिक मतभेद सर्व काही प्लिज प्लिज बाजूला ठेवा आणि आपल्या नातेवाईक , मित्र परिवार व आप्त स्वकीयांसह संपर्कात रहा . कॉल मेसेज तर कधीच कुणाचा मिस करू नका अशी माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे. लवकरच हा वाईट काळ सरेल आणि आपण सर्व पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू’.

महत्त्वाच्या बातम्या

IMP