आदिवासी भागातील विद्यापीठाचे मॉडेल आवडले उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना… नक्की वाचा काय आहे हे मॉडेल!

Uday Samant

गडचिरोली : गडचिरोली येथे अंतिम परिक्षेच्या संदर्भात बैठक घेण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आले होते. गोंडवाना विद्यापीठाकडून परिक्षेसंबंधी झालेली तयारी, अडचणी तसेच इतर अनुषंगिक विषयावर मंत्र्यांनी बैठकीचे आयोजन जिल्ह्यात केले होते. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील ऑनलाईन परिक्षेबाबत तसेच ऑफलाईन (प्रत्यक्ष) परिक्षेबाबत तयार केलेले मॉडेलची पाहणी केली.

यामध्ये परिक्षा पद्धतीची निवड, अडचणी आल्यास पून्हा परिक्षा तसेच अनुउर्त्तीण विद्यार्थ्यांबाबत पून्हा संधी यातील नियोजन चांगले असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. श्रीनिवास वरखेडी, कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले, संचालक परिक्षा व मुल्यमापन डॉ. अनिल चिताडे, प्रभारी जिल्हाधिकारी अनंत वालस्कर, सहायक जिल्हाधिकारी आशिष ऐरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील १७२२९ विद्यार्थी अंतिम परिक्षा देणार असून यामध्ये चालु वर्षीचे १५१५३ विद्यार्थी मागील वर्षी विषय राहिलेले. २0१३ विद्यार्थी तर बहिस्थ ६३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मंत्री सामंत म्हणाले की, विद्यार्थ्यांना घरातूनच परिक्षा द्यावी, असे प्राधान्य देण्यात आले होते. यानूसार १७२२९ पैकी ९0 टक्के विद्यार्थी घरातूनच ऑनलाईन परिक्षा देण्यासंदर्भात तयार झाले आहेत.

तर ७0६ विद्यार्थी तांत्रिक अडचणीमुळे तसेच स्वत: निर्णय घेवून प्रत्यक्ष परिक्षा देणार आहेत. प्रत्यक्ष (ऑफलाईन) परिक्षा देणारे ७0६ विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी अडचणी निर्माण होवू नयेत म्हणून जिल्हाधिकारी यांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे गोंडवाना विद्यापीठाने अंतिम परिक्षेबाबत तयार केलेले मॉडेल माझ्या मते राज्यात अग्रस्थानावर आहे, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या :