आणि त्या क्षणी साहेबांच्या जागी केंद्रात मंत्रिपदाची ऑफर होती – पंकजा मुंडे

टीम महाराष्ट्र देशा – साहेबांचा राख सावडण्याचा दिवस होता, त्याच दिवशी मला मुंडे साहेबांच्या जागी केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिली होती अस ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवलं. विशेष म्हणजे बीडमधील जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पंकजा यांनी हे विधान केलं.

तुमचे-माझे आधारवड असलेले मुंडे साहेब अचानक गेले, अख्खा महाराष्ट्र नव्हे तर देश शोकसागरात बुडाला होता. मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असं वक्तव्य करुन पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरीचे असल्याचं दाखवून दिलं होतं. त्यांच्या विधानावर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं.आता तर केंद्रात ग्रामविकास मंत्रिपद मिळणार होतं, मात्र मीच नकार दिला, असं विधान करुन पंकजा मुंडेंचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

You might also like
Comments
Loading...