दुसऱ्या दिवशीही मुंबईचा दुध पुरवठा सुरळीत

मुंबई : शेतकरी आंदोलनाचे पडसाद राज्य भर ठीक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मुंबई आणि इतर शहरांचा दुध पुरवठा रोखून शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या मान्य करून घेणे हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मुख्य हेतू आहे. मात्र हा उद्देश साध्य होताना दिसत नाही.कारण मुंबईचा दुध पुरवठा आज दुसऱ्या दिवशी देखील सुरळीत सुरु आहे.

मुंबईचा दुध पुरवढा सुरळीत चालवा यासाठी रात्री मुंबई पोलीस स्वतः हा रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईच्या प्रत्येक प्रवेश द्वारा पासून ते दुकानांन पर्यंत दुधाच्या गाड्यांना संरक्षण दिले जात आहे. यासाठी प्रत्येक दुधाच्या गाडीबरोबर एक पोलीसांची गाडी होती. मुंबईला दुध पुरवठा हा बाहेरून होत असतो त्यामुळ हे पाऊल मुंबई पोलिसांकडून उचलले गेले. गोकुळ सह अनेक संघटनांनी याला पाठींबा दिला आहे. सातारा सोलापूर पुणे ओरंगाबाद या जिल्हांतील दुध पुरवठा पूर्ण पणे रोखला आहे.

पुण्यात तर रस्तावर दुध फेकून देण्यात आलं. दुध आंदोलनाला राष्ट्रवादी कॉंग्रेससह शिवसेनेने देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आपला पाठींबा देऊन शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम उभे आहेत.

दरवाढीशिवाय माघार नाही : राजू शेट्टी

चंद्रकांतदादांचे कौतुकच वाटते ! – जयंत पाटील