डॉक्टरांनी एकत्र येत दिला ‘रन फॉर हेल्थ’ चा संदेश

पिंपरी :  १ जुलै रोजी पिंपरी चिंचवडमध्ये डॉक्टरांनी एकत्र येत ‘रन फॉर हेल्थ’ चा संदेश दिला. यामध्ये जवळपास सर्वच डॉक्टरांच्या संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. सकाळी सहाच्या सुमारास ‘झुंबाणे’ या मॅॅरेथॉनच्या स्पर्धेला सुरुवात झाली. पिंपरी चिंचवड परिसरातील ११०० डॉक्टरांनी यात सहभाग घेतला होता.

ही स्पर्धा पाच आणि दहा किलोमीटर अशा दोन टप्प्यात आयोजित करण्यात आली होती. भोसरी प्राधिकरण स्पाईन रोड, एमआयडीसी पोलीस स्टेशन असा या मॅॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग होता. डॉक्टरांनी दैनंदिन जीवनातून स्वतःहासाठी वेळ काढून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे म्हणून या मारेथोन चे आयोजन केले होते.

या वेळी नॅॅशनल इटी ग्रेटेड असोसियेशनचे अध्यक्ष डॉ. सत्यजित पाटील. सेक्रेटरी डॉ. संतोष भांडवालकर, ज्युपिटर हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर, मॅॅनेजर. गिरीश निकम, डेंटल असोशिएशनच्या डॉ. मनीषा गरुड,सुजाता बावसकर, प्रीती गुप्ते, ज्योती माटे तसेच डॉक्टर समीर देशमुख, डॉ. रमेश केदार, डॉ.प्रताप सोमवंशी, डॉ. गणेश भोईर आदी उपस्थित होते.

काय आहेत कारल्याचे फायदे?

हेल्थ टिप्स- रोज ताक पिणे म्हणजे अमृतासारखं आहे