fbpx

बाळासाहेबांच्या स्मारकाचा तिढा सुटला

टीम महाराष्ट्र देशा : अनेक दिवस प्रलंबित असेलला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा प्रश्न अखेर सुटल्याचं दिसत आहे. मुंबईच्या महापौर बंगल्याची जागा अखेर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टच्या नावावर करण्यात आली आहे. त्यामुळे सध्याचे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना राणीच्या बागेतील पर्यायी निवासस्थानी राहायला जावे लागणार आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा प्रश्न बरेच दिवस रेंगाळला होता.या बंगल्याची तोडफोड केली जातेय कि काय अशी देखील शंका उपस्थित केली जात होती. पण आता स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टच्या नावावर केली आहे तसेच हे स्मारक बंगल्याच्या तळघरात होणार असल्याने बंगल्याची कोणत्याही प्रकारची तोडफोड होणार नाही. तसेच वृक्ष तोड देखील होणार नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ऐतिहासिक वारसा वारसा लाभलेल्या या वस्तूचे जतन केले जाणार आहे.