भारतीय संघाच्या कौतुकात वसीमने शेअर केलेले मीम सोशल मीडियावर व्हायरल

vasim jafar

श्रीलंका : श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. श्रीलंकेने दिलेल्या २६३ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने ३ गडी गमावत सहज पार केले. वेगवान खेळीसाठी सलामीवीर पृथ्वी शॉला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारीत ५० षटकात श्रीलंकेने ९ गडी गमावत २६२ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ३७व्या षटकात ३ गडी गमावत हे अव्हान सहज पार केले. यासह तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत भारताला १-० अशी आघाडी मिळाली.

या सामन्यात भारतीयचे क्षेत्ररक्षकन उत्कृष्ट होते. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण संपूर्ण सामन्यात दमदार राहिले. भारतीय संघाच्या या क्षेत्ररक्षणाचे कौतुक करत भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरने आपल्या अंदाज ट्विट करत भारतीय संघाचे कौतुक केले आहे. वासिमने ‘सोनी सब’ वरील प्रसिद्ध मालीका FIR मधील एक मिम्स शेअर करत ‘well bro who the you the are this the?’ क्षेत्ररक्षक श्रीलंकेच्या फलंदाजांना असे म्हणत असल्याचे दर्शविले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP