fbpx

‘शेतमालाच्या दरासाठीच्या समितीमध्ये असणार अण्णांनी सुचवलेले सदस्य’

टीम महाराष्ट्र देशा : देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या दरासाठी समिती स्थापन करणार येणार आहे. या समितीवर अण्णा हज्रे यांनी सुचवलेले सदस्यही असतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राळेगणसिद्धी येथे दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्यासोबतच्या चर्चेनंतर त्यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांना आपले उपोषण मागे घेण्याची विनंती केली. अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या विनंतीनंतर उपोषण मागे घेतले.

यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांच्या सर्व मागण्या मान्य करत, त्या पूर्ण करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी त्यांना दिले आहे.
अण्णा हजारे यांनी गेल्या सात दिवसांपासून लोकपाल आणि लोकायुक्ताच्या मुद्यांसह विविध मागण्यांसाठी उपोषण सुरु केले होते. त्यांच्या या उपोषणादरम्यान केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अण्णांची भेट घेतल्यानंतर अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेत असल्याचे सांगितले.