“जलील यांची घेतलेली भेट ही सात्वंनपर होती”, राजेश टोपेंची माहिती
मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यात झालेल्या भेटीनंतर एमआयएम आणि महाविकास आघाडीच्या युतीबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, जलील यांची घेतलेली भेट ही सात्वंनपर असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राजेश टोपे म्हणाले की,‘इम्तियाज यांच्यासोबत झालेली भेट अनौपचारिक होती. काही दिवसांपूर्वी इम्तियाज यांच्या मातोश्रीचे निधन झाले होते. त्यामुळे ही भेट सात्वंनपर होती’, असे टोपे म्हणाले. तसेच यावेळी काही मुद्यांवर अनौपचारिक चर्चा झाली. यामध्ये उत्तर प्रदेशमधील निवडणुकीत एमआयएममुळे काही १०-१५ जागा पडल्या, आदींसंदर्भात चर्चा झाल्याचे टोपे म्हणाले.
दरम्यान, भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना जलील म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशात तुमच्यामुळे भाजप जिंकली, असा आरोप एमआयएमवर करण्यात आला. हा आरोप भविष्यात लावला जाऊ नये, म्हणून आम्ही महाविकास आघाडीत सामिल होण्याचा प्रस्ताव देतोय’. तसेच पुढे ते महाविकास आघाडीला उद्देशून असेही म्हणाले कि, तुमच्या तीनचाकी रिक्षाला अजून एक चाक जोडा, मोटर कार करा, मग बघा कशी चालते.
महत्वाच्या बातम्या
- “सत्तेच्या खुर्चीसाठी किती तिलांजली”, मविआ सरकारवर केशव उपाध्येंचा हल्लाबोल
- भगवंत मान यांच्या नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पडला पार!
- “शरद पवार पावसात भिजले अन् निमोनिया…”, राष्ट्रवादीचा टोला
- Women’s WC 2022 : मितालीचा अजूनही क्रिकेटवर ‘राज’ ; ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात रचले रेकॉर्ड!
- “…महाराष्ट्रातही आध्यात्मिक शिक्षणाचा समावेश करावा”- आचार्य तुषार भोसले