fbpx

खडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीला परिवर्तन नको ?

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील भाजप – शिवसेना सरकार विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून परिवर्तनाचा निर्धार करत अनेक ठिकाणी सभांच आयोजन करण्यात आलं आहे. या सभांमधून राष्ट्रवादी नेते सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, भाजप विरोधात रान उठवत असताना मात्र माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना चुचकारण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून केला जात आहे. त्यामुळेच राज्यात सत्ता परिवर्तनाचा निर्धार करणाऱ्या राष्ट्रवादीने खडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये आयोजित केलेली सभा रद्द केली आहे .

एकनाथ खडसे हे भाजपवर आपली उघड नाराजी दाखवत आहेत. मध्यंतरी ते भाजपला रामराम करणार असल्याच्या चर्चा देखील सुरु होत्या. त्यामुळेच नाराज खडसेंना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होताना दिसत दिसत.

निर्धारित कार्यक्रमामध्ये बदल करत मुक्ताईनगरमधील सभा रद्द करण्यात आल्याने राष्ट्रवादीला एकनाथ खडसेंच्या मतदारसंघात बदल नको का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर मुक्ताईनगरऐवजी हि सभा जामनेरमध्ये घेतली जाणार आहे.