मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिलासा, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ

टीम महाराष्ट्र देशा :  राज्यात गेले आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू आहे त्यामुळे शाळा, कॉलेज आणि ऑफिसला सुट्या आहेत. राज्यातील सांगली सातारा कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यात पूरस्थिती अजून कायम आहे. पूरस्थिती कायम असल्यामुळे मेडिकल च्या प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवली आहे. विद्यार्थी आपल्या जवळच्या वेद्यकीय महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करू शकणार आहेत.

राज्यातील सीईटी सेलला विद्यार्थ्यानी मेल करून प्रवेश प्रक्रीयेची मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. या मागणीमुळे पूरपरिस्थिती असलेल्या भागात एमबीबीएस/ बीडीएसच्या प्रवेशासाठी पहिल्या फेरीत कॉलेज मिळालेल्या विद्यार्थांना प्रवेशासाठी १२ ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ दिली आहे.

बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस या प्रवेशासाठी पहिल्या फेरीत कॉलेज मिळालेल्या विद्यार्थांना १२ ऑगस्ट सायंकाळी ५ पर्यत मुदत वाढ मिळाली आहे, असे सीईटी सेल कडून सांगण्यात आले आहे. पूरस्थिती असलेल्या जिल्ह्यात विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे शक्य नव्हते त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती.

एमपीएससी च्या विद्यार्थ्यांचा पेपर देखील पुढे ढकलला 

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे (MPSC)रविवार दिनांक २४ ऑगस्ट 2019 रोजी राज्य कर निरीक्षक(STI) या पदासाठी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद या चार केंद्रांवर मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. याआधी ही परीक्षा ११ ऑगस्ट ला घेतली जाणार होती. महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे मुख्य परीक्षेसाठी पोहचणे अशक्य असल्यामुळे परीक्षेची तारीख बद्दली आहे

 

 

खुशखबर : ९वी, १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत मूल्यमापनाचे कायम