फारोळा जलशुद्धीकरण यंत्राची महापौरांनी केली पाहणी

औरंगाबाद: शहरात गढूळ पाणी आल्यामुळे फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्धीकरण प्रक्रिया आणि रसायनसाठ्याची महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाहणी केली.

दूषित पाण्यामुळे अंबिकानगर, पदमपुरा भागात काही नागरिकांना साथरोगाची लागण झाली होती. थील भांडारगृहात शुद्धीकरण रसायनांचा साठा तीन दिवस पुरेल इतकाच असून तुरटी, ब्लीचिंग आणि क्लोरीनचा साठा संपत आला आहे हे पाहणी दरम्यान समोर आले. ज्या भागात दूषित पाणीपुरवठा होतो आहे, तेथील नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यासाठी शहर अभियंत्यांची एक समिती लगेचच गठित करून जलशुद्धीकरण रसायनांची तातडीने खरेदी करावी, असे आदेशही महापौरांनी दिले. यावेळी उपमहापौर विजय औताडे, सभागृहनेता विकास जैन, नगरसेवक सचिन खैरे आदींची उपस्थिती होती.

You might also like
Comments
Loading...