विनयभंगाच्या व्हीडीओवर मुंबईच्या महापौरांचा खुलासा म्हणाले…

blank

टीम महाराष्ट्र देशा : गेले तीन दिवस मुंबईत प्रचंड पाऊस पडतोय. प्रशासनाचा हलगर्जीपणाचं पितळ उघडं पडलंय. याबद्दल जाब विचारणाऱ्या महिलेचा हात मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर पिरगळताना दिसत आहेत.

मुसळधार पावसामुळे सांताक्रूजमधल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं. यामध्ये ४५ वर्षीय महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. तिला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या२६ मुलाचाही शॉक लागून मृत्यू झाला.

या घटनेनंतरही स्थानिक नगरसेवकांनी भेट दिली नाही. याचा स्थानिकांमध्ये रोष होता. बुधवारी महापौर जेव्हा भेट द्यायला आले, तेव्हा स्थानिक महिलांनी त्यांना घेराव घातला. त्यावेळी महापौरांनी एका महिलेचा हात पिळला होता. खुद्द महापौरांनीच महिलेचा विनयभंग केल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय.

सांताक्रुज मध्ये महापौरांनी एका महिलेचा हात मुरगळल्याचा विडिओ व्हायरल झाल्यानंतर महापौरांनी मात्र त्याच स्पष्टीकरण दिलय. व्हिडिओ मध्ये महापौरांनी हात पिळल्याच दिसत असतानाही मी हात पकडला नव्हता, असं महाडेश्वर यांनी म्हटलंय.

मी शिक्षक आहे मला महिलेशी कस वागायचं हे समजतं. अशा पद्धतीने वागणं ही शिवसेनेची संस्कृती नसल्याचं महापौरांनी म्हटलंय. हे मनसेच्या कार्यकर्त्यांनी राजकारण केलं असल्याचं महापौरांनी म्हटलंय.

पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती कायम आणखी 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…