नाकावरून मास्क खाली घसरला,पोलिसांनी केली रिक्षा ड्रायव्हरला बेदम मारहाण

polise harresment

भोपाल : देशात काल दिवसभरात कोविड-19 ची उच्चांकी रुग्णवाढ नोंदवली गेली. काल सकाळी संपलेल्या 24 तासात तब्बल 1 लाख 3 हजार 558 नवीन बाधितांची नोंद झाली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त होता तेव्हा सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ 97 हजार होती.

देशभरात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील काही दिवसांपासून देशभरात मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातातील इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फैलावत चाललेल्या कोरोना संक्रमणामुळे देशात अनेक ठिकाणी कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. या नियमांचं सक्तीनं पालनही करून घेतलं जात आहे. याच दरम्यान सक्तीच्या सीमा ओलांडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मास्क योग्य पद्धतीनं परिधान केलं नाही म्हणून एका व्यक्तीला दोन पोलीस कर्मचाऱ्यांकडून रस्त्यावरच बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर सध्या समोर आली आहे.

मध्य प्रदेशमधील ३५ वर्षीय कृष्णा केयर रिक्षा व्यवसाय करतात. आपल्या आजारी असलेल्या वडिलांना भेटण्यासाठी कृष्णा रुग्णालयाकडे जात होते. त्याचवेळी इंदूर शहरात कोरोनाविरुद्ध तपासणी मोहीम सुरू होती. याच दरम्यान कृष्णा यांचा मास्क नाकावरून खाली घसरलेला दिसल्यानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले.

यावेळी पोलिसांनी कृष्णा यांना आपल्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये येण्यास सांगितले परंतु कृष्णा यांनी यासाठी नकार दिला दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला रस्त्यावरच बेदम मारहाण केली. या मारहाणीचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियातून समोर आले आहेत. या फोटो-व्हिडिओत पोलीस त्याला कोणतीही सहानुभूती न दाखवता मारहाण करताना दिसत आहेत.

परंतु यावेळी त्याठिकाणी कृष्णा यांचा अल्पवयीन मुलगा देखील होता. कृष्णासोबत असलेल्या त्याच्या अल्पवयीन मुलाला हे दृश्यं पाहून धक्का बसला. तो केवळ मदतीसाठी रडत राहिला. दिवसाढवळ्या रस्त्यावर ही घटना घडत होती आणि बघे ही घटना कॅमेऱ्यात कैद करत होते. परंतु, कुणीही मदतीसाठी मध्ये पडलं नाही.

या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावं कमल प्रजापत आणि धर्मेंद्र जट असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे. संबंधित व्यक्तीनं पोलीस कॉन्स्टेबलची कॉलर पकडल्यानंतर आणि त्यांना शिवीगाळ केल्यानंतर त्यांनी मारहाण केल्याचा दावा, एका पोलीस अधिकाऱ्यानं केला आहे. पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यासाठी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा दावाही पोलीस अधीक्षक आशुतोष बागरी यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या