fbpx

शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार – नरेंद्र मोदी

धुळे : हुतात्मा जवानांच्या प्रत्येक कुटुंबियांना मी आश्वासन देतो, शहीद झालेल्या जवानांनी जे रक्त सांडले आहे, त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी आज पाकिस्तानला ठणकावून सांगितले. धुळे येथील विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

मोदी म्हणाले, आताची जी वेळ आहे, ती संवेदनशीलतेची वेळ आहे. शोक करण्याची वेळ आहे. मात्र शहीद झालेल्या हुतात्मा जवानांनी जे रक्त सांडले आहे, त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाणार आहे.

भारतीयाची एक निती आहे, आम्ही कोणाला डिवचत नाही. मात्र, आम्हाला डिवचले की आम्ही कोणाला सोडणार नाही. यापूर्वी आपल्या भारतीय सुरक्षा दलातील जवानांनी करुन दाखवले आहे. त्यामुळे आताही पुन्हा दाखवून देणार आहे. जवानांनी सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंब आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रत्येक अश्रूंचा बदला घेतला जाणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.