यवतमाळ :- पुसद पालिकेचे खड्यांसोबत लावले लग्न

 संदेश कान्हु , यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी- एकीकडे मुंबईत रस्त्यावरील खड्यांमुळे मोठा वाद सुरु असतांना दूसरी कड़े चक्क रस्त्यावरील खड्यांचे नगर पालिका प्रशासना सोबत लग्न लावण्यात आले. पालिका आणि खड्डे यांचे साथ सूटत नसल्यामुळे यवतमाळच्या पुसद येथे भाजप कार्यकर्त्यांनी हा धक्कादायक प्रकार केलाय. 
पुसद येथील कै, वसंतराव नाईक चौक ते कै,  गोधाजीराव मुखरे चौक दरम्यान रोडवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविन्या साठी वारंवार तक्रार व निवेदन देऊन करवाई झाली नाही. परिणामी  दिप आमवस्येच्या मुहुर्तावर भारतीय जनता पार्टी पुसद व विद्याथीं सेनेच्या वतीने चक्क खड्यांचे पालिके सोबत लग्न लावण्यात आले. विशेष म्हणजे संपूर्ण हिन्दू रीति प्रमाणे लग्न लावण्यात आले. पालिका या प्रकारा मुळे खड़बड़ुन जागी होणार अशी आशा भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
 
याउपर ही येत्या आठ दिवसात शहरातील खड्डे बुजविले नाही तर संपुर्ण शहरातिल खड्यांमधील पानी जमा करून कलश यात्रा नगर परिषद पुसद येथे आणणार असा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला आहे. या आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याचा वीडियो सोशल मीडिया वर वायरल होत आहे.