fbpx

शेतक-यांना हमी भाव देण्याची जबाबदारी बाजार समित्यांची

औरंगाबाद : बाजार समित्यांनीच शेतक-यांना हमी भाव देण्याची जबाबदारी पार पाडावी असे प्रतिपादन हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष व समाजवादी विचारवंत बाबा आढाव यांनी व्यक्‍त केले. केवळ मार्केट शुल्क जमा करणे एवढेच मार्केट कमिटीचे काम नाही असे ते म्हणाले. पीकपद्धती ठरवण्यापासून ते उत्पादनाची विक्री, व्यवस्थापन ही सगळी जबाबदारी त्यांनी पार पाडली पाहिजे असे ते म्हणाले. महामंडळाच्या वतीने गुरुवारी आयोजित शेतक-यांच्या प्रश्नावरील विभागीय परिषदेत ते बोलत होते. सरस्वती भुवनच्या मध्यवर्ती कार्यालय सभागृहात आयोजित या परिषदेला मराठवाड्यातील अनेक शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. व्यासपीठावर पन्नालाल सुराणा, प्रा.सुभाष वारे, श्रीकांत उमरीकर, सुशीला मोराळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.  या परिषदेत बाजार समित्यांचे प्रतिनिधी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, शेतकरी, शेती अभ्यासक एकत्र आले होते. यानिमित्ताने शेतक-याच्या प्रश्नावर चर्चा घडून आली व प्रत्येकांनी नवनवीन सूचना यावेळी मांडल्या.