छत्रपतींच्या गादीचा अपमान मराठा समाज कदापीही सहन करु शकत नाही.- पूजा मोरे

गेवराई : समाजाच्या आर्थिक,सामाजिक,आणि शैक्षणिक विकासासाठी मागील सरकारने सुरू केलेल्या “सारथी” संस्थेतील वाद शमवण्यासाठी चर्चा करून्याकरिता खा.संभाजीराजे भोसले याना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष बैठकीचे आज आयोजन केले होते.

त्या बैठकीसाठी राज्यातील काही मोजके समनवयक खा.संभाजीराजे यांच्या सोबत उपस्थित होते परंतु बैठकी दरम्यान खुद्द खा.संभाजीराजे याना तिसऱ्या रांगेत बसवून त्यांचा अपमान केला आहे.हा सर्व प्रकार उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत झाला.तरी खा. संभाजीराजे यांची सामंजस्याची भूमिका घेऊन ‘मी इथे समाज म्हणून आलो आहे, मला सत्ताधारी समन्वयकांशी आणि मंत्र्यांशी संवाद साधायचा आहे त्यांच्याशी प्रश्नोत्तरे करायची आहेत.’

दरम्यान, संभाजीराजेंच्या आसन व्यवस्थेवरून वाद झाल्यानंतर आता बैठकीचं ठिकाण बदलण्यात आलं असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात ही बैठक सुरू झाली आहे. यावेळी संभाजीराजेंना अजित पवारांच्या बाजूला बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून सारथीबाबत चर्चा सुरू झाली आहे.

मी विचारपीठावर बसलो तर वेगळा संदेश बाहेर जाईल म्हणून माझ्या स्वतःच्या इच्छेने सोशल डिस्टनसिंग पाळत मी खाली बसतो. अशी भूमिका घेतली. खर तर खा.संभाजीराजेंचा अपमान म्हणजे तो छत्रपतींच्या गादीचा अपमान आहे.यामुळे सर्व मराठा समाजाच्या भावना दुखल्या गेल्या आहेत.आग्र्याच्या भेटीत, मागच्या रांगेत उभे केले म्हणून बाणेदारपणे दरबार त्यागण्याचा इतिहास आहे आमचा हे सरकारने आधीच अभ्यासिले पाहिजे होते.सरकारला आजची घटना फार जड जाईल.या घटनेचा मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध व सरकारला याचे परिणाम नक्की भोगावे लागतील असे प्रतिपादन मराठा क्रांती मोर्चाच्या पूजा मोरे यांनी केले आहे.

मानखुर्द मशीदीवरील बेकायदेशीर भोंग्याविरोधात विहिंप शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

‘राष्ट्रीयत्व, धर्मनिरपेक्षता व नागरिकत्व या विषयांवरील धडे अभ्यासक्रमातून वगळण्याचा सीबीएसईचा निर्णय उघड राष्ट्रद्रोह’

‘महाराष्ट्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट’

IMP