‘काल हसणारा माणूस आज जग सोडून जातो’ ; चाहत्यांना रिंकूने केले कळकळीचे आवाहन

रिंकू

मुंबई : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतान देखील अनेक महाभाग कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. या वाढत्या महामारीला थांबवण्याकरिता राज्य शासनाने कडक नियम लागू केली असली तरी नागरिक मात्र नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

गरिक शासनाच्या कोणत्याच नियमच पालन करताना दिसत नाहीत. वारंवार शासनाकडून मास्क वापरण्याचे सांगण्यात येत असले तरी देखील नागरिक याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

परिस्थिती बिकट बनत चालली असल्यामुळे प्रशासनानं नागरिकांनी नियमांचं पालन करावं यासाठी कठोर कारवाई सुरू केली आहे. विशेषतः कोरोनाच्या काळात मास्क न घालणाऱ्या आणि सोशल डिस्टन्सिंगसारख्या नियमांचं पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दरम्यान, अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

रिंकू राजगुरूने सांगितले की, सध्या खूप विचित्र परिस्थिती आहे. काल हसणारा माणूस आज जग सोडून जातो. ज्याला आपण परवा भेटलो आहे आणि अचानक रात्री फोन येतो की तो आपल्यात राहिला नाही. हे खूप भयानक आणि भीतीदायक आहे. जेव्हा माणून या गोष्टीचा अनुभव घेतो तेव्हाच त्याला कळतं. इतकी भयानक परिस्थिती असतानाही काही लोक वेड्यासारखी वागत आहेत. कोरोना वगैरे काही नसतं, मास्क लावणार नाही, असे म्हणणाऱ्या लोकांना इतकेच सांगायचे आहे की असे बेजाबदार वागू नका.

ती पुढे म्हणाली की, मी स्वतः हा अनुभव घेतला आहे. आमच्या इथले काका वारले. माझ्या खूप जवळच्या लोकांना कोरोनामुळे जाताना पाहिले आहे. काही जण सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत. त्याच्यामुळे या व्हायरसकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे मास्क घालणे, हात सतत सॅनिटाइज करणे, स्वतःची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. दुसरे आपले काळजी घेणार नाहीत. त्यामुळे इतके जरी केले तरी खूप आहे. विनाकारण घराबाहेर पडले नाही पाहिजे.

महत्वाच्या बातम्या