MPSCचा मोठा निर्णय : STIची मुख्य परीक्षा ढकलली पुढे

टीम महाराष्ट्र देशा– महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे (MPSC)रविवार दिनांक २४ ऑगस्ट 2019 रोजी राज्य कर निरीक्षक(STI) या पदासाठी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद या चार केंद्रांवर मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे.

याआधी ही परीक्षा ११ ऑगस्ट रोजी नियोजित होती, महाराष्ट्रात आलेल्या भयावह पूर परिस्थितीमुळे मुख्य परीक्षेसाठी पोहोचणे जवळजवळ अशक्य असल्याने या जिल्ह्यांतील परीक्षार्थी हवालदिल झाले होते.अजूनही ही सूचना अधिकृतरित्या पोहोचण्याचे साधन नसल्याने विविध भागातील  परीक्षार्थी विद्यार्थी हे संभ्रमात आहेत.

दरम्यान, राज्यभरात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोल्हापूर, पुणे, सांगली शहरात महापुराची परिस्थिती कायम असून या शहरांच्या विविध भागात पाणी शिरलं आहे. बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची आणखी तीन पथकं तर राज्य आपत्ती निवारण दलाची दोन पथकं तैनात करण्यात आली आहेत. आज काही भागांमधे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचाव कार्य हाती घेतलं जाणार आहे.

सांगली जिल्ह्यातील ब्राम्हणाळ गावामध्ये आलेल्या महापुरात बचावकार्य करणारी बोट उलटून १० – १२ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातल्या एक लाख वीस हजार लोकांना तसंच २५ हजारावर जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान या महत्वपूर्ण निर्णयानंतर पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

‘भाजपला सत्तेचा माज, सत्ताधाऱ्यांकडून चौकशीची भीती दाखविली जातेय’

राज्यात पावसाचा कहर ; जाणून घ्या राज्यभरातील पावसाची स्थिती एका क्लिकवर

पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करा, प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना आवाहन