भाजपला हरवणं हा मुख्य अजेंडा; नंतर नेता ठरवायचा

नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचा पराभव करण्यात इगो आडवा येऊ नये

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीत भाजपला चांगलाच झटका बसला. त्यामुळे विरोधी पक्षांनी आगामी निवडणुकांमध्ये भाजपला धडा शिकवण्यासाठी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाहांचा पराभव करण्यात इगो आडवा येऊ नये, यासाठी नेतृत्वाचा मुद्दा गौण धरण्यावर विरोधकांमध्ये एकमत झालं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाहांचा पराभव करण्यासाठी इगो बाजूला ठेवण्याचा आणि निवडणुकीनंतर नेतृत्वाचा निर्णय योगदानाच्या निकषावर घेण्याचा निर्णय विरोधकांकडून घेण्यात आला आहे. काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी शरद पवारांची भेट घेऊन जवळपास तासभर चर्चा केली. या भेटीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार माजिद मेमन यांनी ही माहिती दिली.

राष्ट्रवादीचे खासदार माजिद मेमन, म्हणाले “विरोधकांच्या एकीमध्ये सर्वात कळीचा मुद्दा नेतृत्त्वाचा असतो. यावेळी मात्र असं ठरलंय की, नेतृत्वाचा विषय आधी आणायचा नाही. आधी सगळ्यांनी एकत्र यायचं, भाजपला हरवणं हा मुख्य अजेंडा आहे.”, तसेच कुणाचं किती योगदान यांवर निकालानंतर नेतृत्वाची चर्चा होईल,

You might also like
Comments
Loading...