‘महाविकास आघाडी सरकारला आताच डिस्चार्ज मिळाला आहे’, नारायण राणेंचा टोला

‘महाविकास आघाडी सरकारला आताच डिस्चार्ज मिळाला आहे’, नारायण राणेंचा टोला

narayan rane

रायगड : गेल्या चार दिवसात राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे कोकणातील अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. चिपळूण, महाड, खेड तालुक्यात महापूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. याची पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी भाजप नेत्यांनी कौकण दौरा आखला आहे. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नारायण राणे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे कोकण दौऱ्यावर आहेत.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणकडे रवाना झाले आहेत. चिपळूणमधील परिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री यांनी काल तळीये गावाला भेट नुकसानग्रस्तांची भेट घेतली होती. तर आज नारायण राणे यांनी महाडच्या तळीयेमध्ये येऊन दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली.
पाहणीदरम्यान राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी त्यांना ‘या दुर्घटनेनंतर राज्य सरकारशी तुमचे काही बोलणे झाले आहे का?’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर ‘कोणते सरकार?’ असा प्रतिप्रश्न राणे यांनी केला. ते म्हणाले, ‘कोणते सरकार? महाराष्ट्र सरकारचे लोकं भेटत नाहीत. बोलत नाहीत. आताच त्यांचा डिस्चार्ज झाला आहे’, असा टोला राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लगावला

प्रशस्तीपत्र देण्याची ही वेळ नाही
यावेळी फडणवीस यांनाही माध्यमांनी राज्य सरकारच्या कामाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, ‘मी येथे चांगले किंवा वाईट काम केल्याचे प्रशस्तीपत्रं देण्यासाठी आलेलो नाही. प्रशस्तीपत्रं देण्याची ही वेळ नाही. मृतदेह बाहेर काढणे हे महत्त्वाचे आहे. प्रशासन चांगले काम करत असेल तर त्यांच्या पाठीशी राहीले पाहिजे’ असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या