टीका होऊ दे, पूर येऊ दे ! तरी मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा ‘महाजनादेश यात्रे’वर

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजानादेश यात्रा काढली होती. मात्र ही यात्रा कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या जलआपत्तीमुळे स्थगित करण्यात आली होती. आता या दोन्ही जिल्ह्यावरची जल आपत्ती टळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची महा जनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे.

याबाबतचे वेळापत्रक जरी केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या यात्रेला 22 ऑगस्ट रोजी धुळे येथून प्रारंभ होणार आहे. अमळनेर येथे सकाळी 11.30 वाजता तर धरणगाव येथे 12.30 वाजता महाजनादेश यात्रा पोहोचणार आहे तर दुपारी 1.30 वाजता जळगाव येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होईल. त्यानंतर दुपारी तीन वाजता जामनेर येथे व सायंकाळी पाच वाजता भुसावळात जाहीर सभा होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस हे सरकारचं काम लोकांपर्यंत पोहोचविणार आहेत.

Loading...

दरम्यान माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन व राज्याला बसलेला अतिवृष्टीचा तडाखा यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली होती. मात्र आता कोल्हापूर सांगली या जिल्ह्यात आलेला महापूर आता ओसरला आहे. मात्र नागरिक अजूनही अन्न, वस्त्र निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. प्रशासनाकडून पूरग्रस्तांना सर्वोतपरी मदत पुरवली जात आहे. तर काही सेवाभावी संस्थांनी देखील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. तर अनेक नेत्यांनी आपल्या वैयक्तिक पातळीवर पूरग्रस्तांना आर्थिक मदत करत आहेत.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी