Devendra Fadnavis । मुंबई : फॉक्सकॉन या मोठ्या प्रकल्पानंतर C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ (Tata AirBus Project) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. IAF सौद्यांतर्गत महाराष्ट्रात सुरू होणारा टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमधील वडोदरा येथे स्थलांतरित झाला आहे. हा प्रकल्प नागपूर येथे होणार होता. नितिन गडकरी आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील याबाबत सांगितले होते. या बातमीनंतर महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. यानंतर यावर आता पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारची बाजू मांडली.
पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले कि, विरोधीपक्षात असतानाही फॉलोअप घेतला, पण तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने याकडे दुर्लक्ष केलं. उद्योगांना आवश्यक त्या गोष्टी पुरवल्या नाहीत. त्यामुळे हे उद्योग राज्याबाहेर गेले, असं ते म्हणाले. महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत, असं भासवलं जातंय. पण या प्रकल्पांसंदर्भात महाविकास आघाडी सरकारने ठोस भूमिका घेतली नाही. म्हणून प्रकल्प राज्याबाहेर गेले, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी वडोदरा येथे या प्लांटचे उद्घाटन केले. शिंदे -फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या १ लाख ८० हजार कोटींच्या ४ प्रकल्पांपैकी ३ गुजरातला नेण्यात आले. महाराष्ट्रातील दोन नियोजित प्रकल्पांना केंद्र सरकारनेच मंजुरी दिली नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार झोपले का?, असा प्रश्न निर्माण होत आहे. हे मोठे प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार नरेंद्र मोदी आणि शहा यांनी गुजरातला दिला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Raj Thackeray | जो तो प्रकल्प गुजरातला का जातो ; राज ठाकरेंच विधान!
- Bachchu Kadu | मी सरकारवर नाराज नाही, नाराजीला रवी राणा कारणीभूत – बच्चू कडू
- Ashish Shelar | माजले होते ते बोके कोरोना काळात खावून खोके ; आशिष शेलार यांची टीका
- Prakash Ambedkar | नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे अडचणीत आले – प्रकाश आंबेडकर
- Rohit Sharma । भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना गमावल्यानंतर रोहित शर्माने सांगितले पराभवाचे मोठे कारण