Share

DDLJ | ‘दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे’च्या प्रेमकथेला आज झाले 27 वर्ष पूर्ण

मुंबई: बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये असे फार कमी चित्रपट आहेत जे सिनेमागृहात दीर्घकाळ राहिले आहे. आजकालच्या तंत्रज्ञानाच्या जगात दर आठवड्याला चित्रपट प्रदर्शित होता आणि लगेच पुढच्या आठवड्यात कुठेतरी गायब होऊन जातात. पण जुन्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर त्यांची गोष्ट काही औरच होती. त्यामधला एक चित्रपट आहे DDLJ ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’. या चित्रपटाच्या नावावर अनेक विक्रम असून हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये सर्वाधिक चालणारा चित्रपट आहे.

आज ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाने 27 वर्षे पूर्ण केली आहे. आजही या चित्रपटातील संवाद गाणी आणि व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या चित्रपटाद्वारे शाहरुख खान आणि काजोल या जोडीने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटाने जणू प्रेमाचा अर्थच बदलून टाकला होता. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटांमध्ये अनेक नात्यांचा दृष्टिकोन वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात आला होता. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना इतकी आवडली होती की ती सुपरहिटच्या यादीत सामील झाली होती.

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’चे 27 वर्ष

आदित्य चोपडा दिग्दर्शित दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाला आज 27 वर्ष पूर्ण झालेले असून यश राज फिल्म्स च्या इंस्टाग्राम हॅण्डलवर एक खास पोस्ट शेअर केली आहेत. या पोस्टला त्यांनी कॅप्शन दिले आहे, ” हे म्हणणे अत्यंत खरे आहे की प्रेम तुम्हाला एक वेगळे स्थान निर्माण करून देते आणि जेव्हा ते तुम्हाला होते, तेव्हा तुम्हाला फक्त एकच गोष्ट करावी वाटते – जी ले अपनी जिंदगी. राज आणि सिमरन या जोडीने रोमान्स ची आणि प्रेमाची व्याख्या बदलून टाकलेली आहे. त्याचबरोबर DDLJ ची अजूनही चाहत्यांच्या मनात घर करून बसलेली आहे.

DDLJ चे 20 वर्ष सिनेमागृहात अधिराज्य

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाने चित्रपट सृष्टीतील अनेक रेकॉर्ड्स मोडले आहे. शाहरुख खान आणि काजोलच्या या चित्रपटाच्या नावावर एक अनोखा विक्रम देखील आहे. तो म्हणजे हा चित्रपट 20  वर्ष सिनेमागृहात चालला आहे. मुंबईतील मराठा मंदिर सिनेमागृह DDLJ हा चित्रपट 1009 आठवडे म्हणजे सतत 20 वर्षे चालला आहे.

DDLJ मधील इतर कलाकार 

DDLJ या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि काजोल मुख्य भूमिकेत दिसले आहेत. तर अनुपम खैर, करण जोहर,अमरीश पुरी,पूजा रुपरेल इत्यादि कलाकार सामील होते.

महत्वाच्या बातम्या  

मुंबई: बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये असे फार कमी चित्रपट आहेत जे सिनेमागृहात दीर्घकाळ राहिले आहे. आजकालच्या तंत्रज्ञानाच्या जगात दर आठवड्याला चित्रपट प्रदर्शित …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now