मुंबई : अभिनेता सनी देओल (Sunny Deols) आणि अमिषा पटेल (Amisha Patel) यांची मुख्य भूमिका असलेला ‘गदर’ चित्रपट ( film Gadar) प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील प्रेमकथा प्रेक्षकांना भावली होती. या चित्रपटातील सनी देओल आणि आमिषा यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसलेला चिमुरडा चरणजीत सिंग उर्फ उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) आता खूप मोठा झाला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो आता माचो मॅन बनला आहे, सिक्स पॅक अॅब्सआणि बॉडी पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
सध्या बॉलीवूड सिनेसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत, मात्र त्याचवेळी जुन्या चित्रपटांचीही लोकांमध्ये क्रेझ दिसून येत आहे. जुन्या चित्रपटांच्या यादीत सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा चित्रपट ‘गदर’ आजही प्रेक्षक मोठया उत्साहाने पाहतात. आता हा चित्रपट पुनरागमन करत असून सकीना आणि तारा सिंग पुन्हा एकदा तीच कथा नव्या रुपात घेऊन येत आहेत. दरम्यान, दोघांचा मुलगा चरणजीत म्हणजेच उत्कर्ष शर्मा देखील चर्चेत आला आहे.
‘गदर’ चित्रपटातील उत्कर्ष शर्माच्या जीमचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत ‘ गदर २’ (film Gadar 2) च्या री-शुटिंगनंतर तो अधिक चर्चेत आला आहे. त्यामुळे उत्कर्षचे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सिक्स पॅक अॅब्समध्ये तर कधी हटके पोज देताना दिसत आहे.
उत्कर्ष शर्माने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात ‘विद्रोह’ या चित्रपटातून केली होती. यानंतर तो ‘तुम्हारे हवाले वतन साथी, अपने, प्रपोज, स्टिल लाइफ आणि जिनियस या चित्रपटातही दिसला. अभिनेता उत्कर्ष शर्मा देखील ‘गदर २’ मध्ये दिसणार असल्याच्या बातम्या येत असून सध्या चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- जिल्हा बँक निवडणुकीच्या विजयानंतर गायब असलेल्या नितेश राणेची पोस्ट
- सिंधुदुसिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपने निर्विवाद विजय मिळवला-चंद्रकांत पाटील
- सिंधदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
- कंगनाने केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे आणखी एक तक्रार दाखल
- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने चारली ‘मविआ’ला धूळ
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<