कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता ‘या’ दिवशी जाहीर होणार

मुंबई : कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 28 फेब्रुवारी रोजी तयार होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. दरम्यान, ही यादी 21 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार होती, मात्र यासाठी सरकारने मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने आकस्मिकता निधीत 15 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. तरी त्या निर्णयावर अद्याप राज्यपालांची स्वाक्षरी झालेली नाही.

या कर्जमाफी योजनेसाठी संबंधित शेतकऱ्यांचे आधारकार्ड बॅंक खात्याशी जोडले असणे आवश्यक आहे. तर काही ठिकाणी अजूनही आधारकार्ड शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याशी जोडले गेलेले नाहीत. हे निदर्शनास आले आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची परतफेड मुदतीत केली आहे, अशांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार अधिवेशन काळात नवीन घोषणा करण्याची शक्यता आहे.

Loading...

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यासाठी महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार सप्टेंबर 2019 पर्यंत दोन लाख रुपयांची कर्जमाफी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यासाठी आकस्मिकता निधीत 15 हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सोमवारपासून (ता. 24) सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला आहे. या योजनेचा लाभ सुमारे 33 लाख शेतकऱ्यांना अपेक्षित आहे.

 

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका