गोड बातमी ! बीबी का मकबरा येथे लाईट अँड साऊंड शो सुरू होणार

औरंगाबाद : शहरातील महत्वपुर्ण पर्यटनाचे केंद्र मानले जाणारे बीबीका मकबरा येथे लाइट अँड साऊंड शो सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आता बच्चे कंपनी तसेच शहरातील सर्व वयातील पर्यटक या वास्तुला नियमीतपणे भेट देत असतात. त्यांना ही गोड बातमी मिळाली आहे. औरंगाबादकरांचा पर्यटन केंद्रातील सर्वात आवडते केंद्र तसेच जीव की प्राण मकबरा समजला जातो.

आमदार अंबादास दानवे यांनी ११ मार्च २०१९ रोजी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन शहरात आग्रा येथील ताजमहाल याची प्रतिकृती असलेल्या बीबी का मकबरा आहे या ठिकाणी रोज हजारोंच्या संख्येने पर्यटक भेट देत असल्याने बीबी का मकबरा येथे लाईट अँड साऊंड शो सुरू करण्यासाठी 200 लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी (दि. ८)  रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी तसेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम, विद्युत विभाग यांना प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्यासाठी अंदाजपत्रकासह आवश्यक प्रस्ताव संचालक पर्यटन संचालनालय महाराष्ट्र यांच्यामार्फत शासनास तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

आता हे आदेश आल्यानंतर कोरोना तसेच लॉकडाऊनच्या काळामध्ये काही हालचाल करतात का ? हे पाहणे महत्वाचे असणार आहेत. तर आता कामांची मंजुरी मिळाल्यानंतर निधी मिळाला तर काम होण्यास हरकत नाही, परंतू आता शासनाच्या आदेशाने हे काम सुरु होणे अपेक्षीत आहे. खुप दिवसांपासूनची नागरिकांची ही मागणी होती. ती आता एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आढवड्यात मंजुर होवून आली आहे. तर आता जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने काम मार्गी लागेल अशी अपेक्षा औरंगाबादकर करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या