पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्याचा तासभर थरार

bibtya

औरंगाबाद : नांदगावतांडा ता.सोयगाव शिवारात पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्याने पाणवठ्याजवळ तासभर थरार दाखवत तिथे असलेल्या निलगायीवर झडप मारण्याच्या प्रयत्न केला. शेतक-यांनी हि बाब पहिल्याने या तासभरचं बिबट्याच्या पाठलागाचा थरार कथन केला आहे. नीलगाय दिसताच तिचेवर हल्ला चढविलेला बिबट्या हा चवताळून हातातून निसटलेल्या निलगायीचा पाठलाग करत असल्याचे शेतकऱ्यांनी टोर्चच्या उजेडात पहिले.

तासभर बिबट्याचा थरार सुरूच होता. यात नीलगाय आपला जीव वाचवण्यात यशस्वी ठरल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले. नांदगाव शिवारात हे शेतकरी एकमेकांच्या संपर्कात राहून शेतात रब्बीच्या पिकांना पाणी भरणा करत असतांना त्यांना हा प्रकार समजला. आवाजावरून या शेतकऱ्यांनी बॅटरीची टोर्च लावून ५० फुटावरून या बिबट्याचे जवळून दर्शन घेतले.

या प्रकरणी वनविभागाने सोयगावचं जंगलात कुठेही वाघ वास्तव्यास नाही आणि वाघ हा जंगलाच्या काट्यांच्या व झुडपांच्या प्रदेशात अस्तित्वात राहत नाही. या वाघाचे पंजे नरम असतात त्यामुळे काटेरी क्षेत्रातून वाघाला चालता सुद्धा येत नाही. त्यामुळे या जंगलात बिबट्यांचे अस्तित्व आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये व रात्रीच्या वेळेत गटागटाने राहावे असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या :