पुढाऱ्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी जातपात निर्माण केली : उदयनराजे

शरद पवार यांना घरचा आहेर दिला आहे.

नवी दिल्ली : भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारावर बोलतांना  ‘पुढाऱ्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी जातपात निर्माण केली’. जात पात जर बघितली तर देशाचे तुकडे होतील हे बघण्यापेक्षा मी मरण पत्करेन असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयन राजे भोसले यांनी स्पष्ट केले.

भीमा कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीनंतर संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे हेच मुख्य आरोपी असून त्यांना अटक करण्याची मागणी भारिप चे प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. तसेच या घटनेमागे काही हिंदुत्त्ववादी संघटना असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. उदयन राजे यांनी भिडे गुरुजींची पाठराखण करत शरद पवार यांना घरचा आहेर दिला आहे.

You might also like
Comments
Loading...