उसाच्या फडातून आलेला नेता ठरतोय उपेक्षितांसाठी तारणहार…

उसाच्या फडातून आलेला नेता ठरतोय उपेक्षितांसाठी तारणहार...

मुंबई : राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा मंत्री म्हणून क्रांतिकारी निर्णय घेता आले याचा विशेष आनंद आहे, अशी भावना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. मुंडेंच्या विभागाकडून जून ते ऑगस्ट महिन्यांचा कार्य अहवाल करण्यात आला असून त्यामध्ये सामजिक न्याय खात्याने या काळात घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांची परिपूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्या कार्य अहवालाच्या मनोगतात त्यांनी भावना व्यक्त केली आहे.

अशात संपूर्ण राज्यात संघर्ष योद्धा अशी बिरुदावली मिरवणाऱ्या धनंजय मुंडे यांनी प्रथमच मंत्रीपदाचा कारभार स्वीकारला आणि आपल्याला मिळालेल्या सामाजिक न्याय विभागाच्या नावाला साजेश काम करत उपेक्षितांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम केले आहे. धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच वादळी राहिलेली आहे. मात्र पहाटेच्या कथित शपथ विधीत धनंजय मुंडेंच नाव आल आणि आतापर्यंत मिळवलेल सगळ पाण्यात गेलं. अस वाटत असताना या योध्याने पुन्हा संघर्ष केला आणि आपल्याला मिलेल्या संधीच सोन करत पुन्हा एकदा त्याच खमक्या आवाजात महाराष्ट्राला सांगितल ‘तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करणे की, लेकीन मै जब जब बिख्ररा हू दुगनी रफ्तार से निखरा हू’ …

महाराष्ट्रात कोरोनाचे आकडे वाढत असताना महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात विलगीकरणात असतानासुद्धा मुंडेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रीमंडळ बैठकीत व त्यांच्या खात्यातील अधिकार्यांशी चर्चा सुरू ठेऊन कारभार केला.

आतापर्यंत शिष्यवृत्ती घोटाळे, गैरव्यवहार झाले म्हणून न्याय व विशेष सहाय्य विभाग भ्रष्टाचाराचं कुरण आहे अशा टिका झाल्या.अनेकांंच्या चौकश्या झाल्या त्यांना तुरुंगात जावं लागलं पण जेव्हा पासून धनंजय मुंडे यांनी या खात्याची जबाबदारी स्वीकारली आहे तेव्हा पासून एकही गैरव्यवहार या खात्यात दिसून आलेला नाही. हेच मुंडेंचं क्लिन ईमेज आणि भ्रष्टाचाराविरोधात झिरो टॉलरन्सचं उदाहरण आहे.

सामाजिक व न्याय विभागातर्फे नव उद्योजकांना येत्या वर्षभरात 100 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्याचा मानस मुंडेंनी ठेवला आहे. सध्या बेरोजगारीचा वाढता दर बघता धनंजय मुंडे यांनी घेतलेलं हे पाऊल खूप प्रशंसनीय आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी जे जाचक नियम होते ते आता बदलून विद्यार्थी हाताचा निर्णय घेण्यात आला.

कोरोनामुळे जे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत होते अशा विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीद्वारे निर्वाह भत्ता देण्यात आला.मोठमोठ्या शहरांमध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेसाठी 35 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत घेतलेले अनेक निर्णयांचं स्वागत विद्यार्थ्यांनी केलं आहे.

महाराष्ट्रात अशा खूप भटक्या जाती आणि जमाती आहेत ज्यांची मुलं शाळेपासून वंचित आहे अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धनंजय मुंडेंनी राज्यस्तरीय बैठक घेऊन त्या मुलांना अँड्रॉइड फोन, ईटरनेट कनेक्टिव्हिटी, शिक्षकांचे थकीत वेतन यासंदर्भात अनेक प्रलंबित निर्णय निकाली काढले.

मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयास 12 कोटी 79 लाख रुपये मंजूर करून दिले.तसेच महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना याची काळजी घेतली जावी म्हणून अंबाजोगाई तालुक्यात लोखंडी सावरगांव येथे मराठवाड्यातील सर्वात मोठे जम्बो रुग्णालय उभारले.

तसेच परळी तालुक्यातील प्रस्तावित सिरसाळा एमआयडीसीसाठी जमिनीची पाहणी करून या कामास गती देण्यासाठी प्रयत्न केले आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासंदर्भात निर्णय घेतला असून लवकरात लवकर त्याची अंमलबजावणीही करण्यात येईल अशी प्राथमिक माहिती मुंडेंनी या अहवालात दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

पुण्यात ऑक्सिजनचा तुटवडा,अजितदादा अधिकाऱ्यांवर भडकले

मराठा आरक्षण: सरकारने गांभीर्य दाखवले नाही तर रस्त्यावर उतरू ; शिवेंद्रराजेंचा इशारा

तर आम्ही प्रियांका गांधींचा बंगला पाडू- भाजप