fbpx

पवारांनंतर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असणाऱ्या ‘या’ नेत्याने घेतला लोकसभा न लढविण्याचा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा:आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने देशभर चर्चा झाली. आता पवारांनंतर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असणाऱ्या बसपा प्रमुख मायावती यांनी लोकसभा न लढविण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

निवडणुकांचे वातावरण तापलेले असतानाच बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मी यंदा लोकसभा निवडणूक लढवणार नसणार असल्याची घोषणा आज केली आहे.उत्तर प्रदेशात सपा-बसपा यांनी आघाडी करून वेगळी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या विजयासाठी आणि देशातील सद्यस्थितीचा विचार करता आपण लोकसभेची आगामी निवडणूक लढवणार नसल्याचे बसपा अध्यक्षा मायवती यांनी बुधवारी जाहीर केले.