गेल्यावेळी पुतण्याच्या बोलण्यामुळे गेली, आता काकांच्या हातवाऱ्यामुळे सत्ता जाणार

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीला शेवटच्या टप्प्यात चांगलेच रंग चढले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. त्यातच आज भाजपाच्या रम्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधाला.
” गेल्यावेळी सत्ता पुतण्याच्या वक्तव्यामुळे गेली होती. यावेळी काकांच्या हातवाऱ्यामुळे जाणार असल्याचा डोस भाजपाच्या रम्याने राष्ट्रवादीला दिला आहे. अजित पवार यांनी सत्तेत असताना ‘धरणात पाणी नाही तर….’ केलेल्या या वादग्रस्त वक्तव्याची शिकवण घरातूनच मिळाल्याचा खोचक टोमणा रम्याने लगावला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पैलवानावरून केलेल्या विधानाला उत्तर देताना पवारांनी ज्याप्रकारे हातवारे केले. त्यावरून भाजपमधून संताप व्यक्त केला जात होता. त्या नंतर पवारांच्या हातवाऱ्यावरून भाजपाकडून ”आम्ही नटरंगसारखे काम केलं नाही, त्यामुळे आम्ही उत्तर देणार नाही, ” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या हातवाऱ्यावरून भाजपाने व्यंगात्मक टीका केली आहे. दरम्यान, सोलापूरमधील देशमुख नावाच्या शेतकऱ्याने आघाडी सरकारच्या काळात मुंबईत पाणी मिळावे म्हणून उपोषण केले होते. तेव्हा या उपोषणाची खिल्ली उडविताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाणीच नाही तर सोडणार कुठून, असा सवाल करताना काय लघुशंका करायची का, असे विधान केले होते.

तर ” अरे हे बारामतीवाले साहेब मुख्यमंत्र्यांना उत्तर देताना म्हणाले ,” कुस्ती ही पैलवानांशी होते, अशांशी नाही” आणि हे बोलताना चक्क ‘सूचक’ हातवारे केलेत त्यांनी किती घसरलेत साहेब ! तरीच दादा जेव्हा धरण भरण्याची खालच्या पातळीवरची भाषा बोलले तेव्हा मी विचार करयचो की हे येतं कुठून? आता समजलं त्यांची खरी गंगोत्री तर घरातच आहे. ” असा खोचक टोला रम्याने लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Loading...

 

Loading...

 

Loading...