राहुल गांधींनी स्वतः भाजपात प्रवेश करावा हाच शेवटचा पर्याय उरलाय – निलेश राणे

nilesh rane vs rahul gandhi

सिंधुदुर्ग : काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अनेक नेते त्यांच्यापासून दूर जात आहेत. काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली. तर, राजीव सातव यांचेआकस्मिक निधन झाल्याने राहुल गांधी यांनी अत्यंत जवळचा व विश्वासू सहकारी गमावला. आता उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

जितिन प्रसाद यांनी आज केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, नड्डा भाजपा मुख्यालयात अनुपस्थित होते.

जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर खोचक टीका केली आहे. राहुल गांधी यांनी स्वतः भाजपात प्रवेश करावा हाच त्यांच्याकडे शेवटचा पर्याय आहे, असा टोला राणे यांनी लगावला आहे.

‘राहुल गांधींच्या सगळे जवळचे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधींच्या स्वभावाचाचं हा एक भाग आहे, मला सगळं कळतं आणि मीच सर्वात शहाणा हा स्वभाव काँग्रेसला घेऊन डुबला. राहुल गांधी यांनी स्वतः भाजपात प्रवेश करावा हा त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय उरला आहे,’ असा सल्ला निलेश राणे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP