मुख्यमंत्र्यांनी घेतले कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे अंतिम दर्शन

मुंबई : कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे क.जे. सोमय्या हॉस्पिटलमध्ये गुरुवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून सोमय्या हॉस्पिटलमध्ये जाऊन अंतिम दर्शन घेतले.

यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पदुममंत्री महादेव जानकर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार राज पुरोहित, आशिष शेलार, संजय कुटे, मधू चव्हाण, माधव भांडारी, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी फुंडकर यांचे कुटुंबीय आमदार आकाश फुंडकर व सागर फुंडकर यांची भेट घेऊन सांत्वन केले.

You might also like
Comments
Loading...