नांदेड येथे अस्वलाच्या हल्ल्यामध्ये मजुर गंभीर, यवतमाळ रुग्णालयामध्ये हलवले

नांदेड : माहूर तालुक्यामधील दत्तामांजरी येथील एका मजुरावर अस्वलाने हल्ला केल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले आहे. रोहिदास पुरण जाधव ( ५५)  असे जखमी मजुराचे नाव आहे. जखमी अवस्थेत त्यांना यवतमाळ येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

रोहिदास जाधव हे शेतामध्ये शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी गेले होते. या वेळी दुपारी यांच्यावर एका अस्वलाने हल्ला केला. जाधव यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी असलेले शेतकरी मदतीला धावून आले. अस्वलाच्या तावडीतून जाधव यांची सुटका केली. जखमी झालेल्या जाधव यांना माहुच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर उजव्या पायासह मांडीला अस्वलाने चावा घेतला असल्याने खुप जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील चांगल्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच जाधव यांच्या आरोग्याची विचापुल देखील केली. तसेच जाधव यांना तात्पुरती आर्थिक मदत देखील दिली आहे. आता वनविभाग माहूर तालुक्यातील दत्त मांजरी या गावांमध्ये अनेक वेळा वन्य प्राण्यांनी हल्ला करण्याचे प्रकार घडत असल्यामुळे तेथे वन विभागाने तत्काळ काही तरी ठोस उपाययोजना करण्याची येथील नागिरकांनी मागणी केली आहे. तसेच वन विभागाचा एखादा कर्मचारी तेथे वन्य प्राण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तेथे ठेवावा. जेणे करुन आपात्कालीन परिस्थितीमध्ये कशी परिस्थिती प्रमाणे कसे जिवन जगायचे असा सवाल येथील नागरिक आता विचारु लागले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या