कोळी समाजाचा ढाण्या गेला, शिवसेना नेता अनंत तरे यांचे निधन

ठाणे : शिवसेनेचे नेते, ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

अनंत तरे हे ठाण्याचे माजी महापौर होते. त्यानंतर २००० मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले होते. २००८ मध्ये त्यांची शिवसेना उपनेते म्हणून निवड करण्यात आली. २०१५ मध्ये त्यांची पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. ते कोळी समाजाचे नेते होते. शिवाय एकविरा देवी ट्रस्टचेही अध्यक्ष होते. राजकारणाबरोबरच त्यांचं सामाजिक चळवळीती योगदान मोठं होतं. त्यांच्या जाण्याने ठाणे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

अनंत तरे यांना ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात अनेक दिवसांपासून उपचार सुरू होता. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे ठाणे जिल्हा एका मोठ्या नेत्याला मुकल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या