‘ती महाराजा खुर्ची आधी उचला’ अजित पवारांनी नाकारलं सिंहासन

उमरी: हल्लाबोल यात्रे दरम्यान नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील सभेतील व्यासपीठावर अजित पवारांनी सिंहासन नाकारलं. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. पवारांनी सिंहासन नाकारल्यावर कार्यकर्त्यांची  धावपळ उडाली.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाड्यात हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील सभेसाठी अजित पवार आणि अन्य नेत्यांचे व्यासपीठावर आगमन झाले. व्यासपीठावर पवारांसाठी एक राजेशाही सिंहासनासारखी महाराजा खुर्ची मांडली होती. तर बाजूला साध्या खुर्च्या होत्या. मात्र पवारांनी सिंहासनावर बसण्यास स्पष्ट नकार दिला आणि ‘ती महाराजा खुर्ची आधी उचला’ असा आदेश त्यांनी दिला.

You might also like
Comments
Loading...