कर्नाटकच्या लोकायुक्तांना ऑफिसमध्ये घुसून चाकूने भोसकले

p v shetty

बेंगळुरू: कर्नाटकमध्ये लोकायुक्त पी. विश्वनाथ शेट्टी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला करण्यात आला आहे. लोकायुक्त पी. विश्वनाथ शेट्टी यांच्यावर ऑफिसमध्ये घुसून चाकू हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शेट्टी यांना जखमी अवस्थेमध्ये मल्ल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास तेजस शर्मा नावाच्या हल्लेखोराने लोकायुक्तांच्या कार्यालयामध्ये घुसून त्यांच्यावर चाकून तीन वार केले. पी.विश्वनाथ शेट्टी हे कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती होते. त्यांनी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये लोकायुक्त पदाची शपथ घेतली होती. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून तो टुमकुरचा रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपीविरोधात लोकायुक्त कार्यालयामध्ये १८ तक्रारी दाखल आहेत. यापैकी एका प्रकरणामध्ये लोकायुक्त शेट्टी यांनी आरोपीला चौकशीसाठी समन्स बजावला होता. चौकशीसाठी कार्यालयात दाखल झाल्यावर त्याने शेट्टी यांना चाकूने भोसकले. हा वार इतका जबरदस्त होता की भोसकल्यानंतर चाकू मोडल्याचं पोलिसांनी सांगितले.