Kapli Sharma Show- ‘बूवा’ येणार पुन्हा कपिलच्या शोमध्ये

‘द कपिल शर्मा’ शोला कपिल आणि सुनिल ग्रोव्हरच्या वादामुळे उतरती कळा लागली होती. परंतु आता काही जुनीच कलाकार मंडळी या शोमध्ये पुनरागम करणार आहेत. त्यामुळे हा शो पुन्हा एकदा नव्याने सुरू होणार आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांची लाडकी ‘बूवा’ उपासना सिंग पुन्हा एकदा या शोमध्ये दिसणार आहे. बूवाच्या भूमिकेतील उपासना अतिशय लोकप्रिय होती. परंतू आता ती या शोमध्ये वेगळी भूमिका साकारणार आहे.
यावेळी बोलताना उपासनाने सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून या शोसाठी काम करण्याबाबत मला विचारण्यात येत आहे. तसेच प्रेक्षकांची उत्सुकता पाहून मी पुन्हा कपिलसोबत काम करण्यास तयार आहे. यामुळे कपिलला काहीसा दिलासा मिळाला असला तरी सुनिल ग्रोव्हरची जागा भरणे शक्य नाही.
[jwplayer Gcqt5a1G]