भर पाऊसात कंगना घेतीये घोडेस्वारीचा आनंद ; सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल

कंगना

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला कोरोनाची लागण झाली होती. तिने स्वतः याबाबत आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून माहिती दिली होती. काही दिवसातच कंगनाने कोरोनावर मात केली. कंगना कोरोनातून बरी होताच आपल्या मनालीतल्या घरी रवाना झाली होती. काही दिवसातच कंगना मुंबईला परतली आहे. मुंबईला परताच कंगनाने कशी कोविडवर मात केली याचा एक व्हिडीओ शेअर केला होता.

दरम्यान, कंगनाने आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती घोडेस्वारीचा आनंद घेताना दिसते आहे. रविवारच्या सुटीचा आनंद घेत तिने बराचवेळ घोडेस्वारी केली. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्या तिने याचे कारण देखल सांगितले आहे. जयललिता यांचा बयोपिक असलेल्या “थलायवी’साठी कंगणाने खूप वजन वाढवलेले होते. मात्र आता वजन कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणूनच बऱ्याच दिवसांनी घोडेस्वारी करायला गेले होते, असे कंगणाने म्हटले आहे.

दरम्यान, कंगनाचा एक फोटो मध्यंतरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होता. या फोटोत कंगणाचे वजन वाढलेले दिसत होते. यामध्ये कंगना बरीच जाड दिसत होती. तिच्या या वाढलेल्या वजनाच्या फोटोमुळे कंगना सोशल मीडियावर बरीच ट्रोल देखील झाली होती. काहींनी तर कंगनाला प्रेग्नेंट असल्याचं देखील म्हंटल होत.

महत्वाच्या बातम्या 

IMP