रेल्वे स्टेशनवर असलेले ‘जन आहार’ केंद्र लवकरच इतिहास जमा

रेल्वे स्टेशनवर स्वस्तात मिळणार जेवण आता होणार महाग

पुणे : रेल्वे स्टेशनवर स्वस्तात मिळणार जेवण आता महाग होणार आहे. रेल्वे स्टेशनवर असलेल्या ‘जन आहार’ केंद्रांचे आता खासगीकरण करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना दहा ते वीस रुपयांपर्यंत मिळणारे हक्काचे जेवण आता महागणार आहे. इंडियन रेल्वे केटरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (आयआरसीटीसी) या संदर्भातील निविदा काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच या केंद्राच्या जागी नवीन फूडप्लाझा उभे राहणार आहे. रेल्वे प्रशासनाने आपल्याकडचे अधिकार आयआरसीटीसी ला दिले आहेत त्यामुळे आता रेल्वे स्टेशनवर मिळणाऱ्या जेवणाचे दर आता आयआरसीटीसी ठरवनार आहे त्यामुळे जेवण महाग होणार आहे.

प्रवाशांना स्वस्तात जेवण मिळावे, यासाठी 1956 मध्ये रेल्वे प्रशासनाने स्टेशनवर खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली होती; तसेच सर्वसामान्य नागरिकांना हे खाद्यपदार्थ रास्त दरात उपलब्ध व्हावेत, यासाठी ‘जन आहार’ केंद्र सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतला होता. त्यानुसार दहा रुपयांना पुरी आणि बटाटा भाजी या केंद्रात मिळत होती. कालांतराने त्यांचे दर वाढून वीस रुपये झाले होते. आता मात्र केंद्र बंद करून त्या ठिकाणी फूडप्लाझा सुरू करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला आहे. यापुढे पश्चिम आणि मध्ये रेल्वेच्या सर्व स्टेशनवरील या केंद्रांच्या जागी आता हे प्लाझा दिसणार आहेत. त्यामुळे खाद्यपदार्थांचे दर नक्कीच वाढनार आहेत.

आयआरसीटीसीने घेतलेल्या निर्णयाने सर्वसामान्य नागरिकांची त्यामुळे गैरसोय होणार आहे. सर्वसामान्यांनसाठी सुरु करण्यात आलेली ही सुविधा आज खाजगी कंत्रातदारांच्या घशात घातली आहे. यामुळे जेवणाचे दर कमालीचे वाढणार आहेत यामुळे गरीब लोकांचे हाल होणार आहेत.
– हर्षा शहा (रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा)

You might also like
Comments
Loading...