आयपीएल च्या पुढील मोसमात पहायला मिळणार जम्मू-काश्मीरचा संघ

टीम महाराष्ट्र देशा – गेल्या काही वर्षांत जम्मू-काश्मिरने अनेक प्रतिभावान खेळाडू घडवले आहेत. जम्मू-काश्मिरमधील तीन क्रिकेटपटूंनी IPLच्या विविध क्लबचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र आता इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL) जम्मू-काश्मीर स्वतःचा संघ उतरवण्याच्या तयारीत आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी तसे संकेत दिले आहेत.

” जम्मू-काश्मीरचा संघ IPLमध्ये खेळवता येईल का, यासाठी मी अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यासोबत बोलण सुरू आहे. लवकरच आयपीएलचे सामने जम्मू-काश्मिरमध्येही पाहायला मिळतील असं ते म्हणाले.