पारंपारिक वाद्यांच्या गजरात जलयाञेचा सोहळा तुळजापुरात झाला संपन्न

tuljapur

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञोत्सवातील प्रमुख असा जलयाञेचा सोहळा सोमवार दि २५ रोजी पारंपारिक वाद्यांच्या गजरात पार पडला. दुष्काळाचे संकट येवु नये म्हणून प्रतिवर्षी तिर्थक्षेञ तुळजापूरात हा जलयाञेचा सोहळा साजरा केला जातो यंदा या सोहळ्यावर कोरोनाचे सावट असल्याने मोजक्याच कुमारीका सुवासनींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

जलयाञा सोहळ्यानंतर श्रीदेवीजींची सिंहासनावर शेषशाही अलंकार महापुजा मांडण्यात आली होती.सोमवार दि२५रोजी सकाळी तिर्थक्षेञ तुळजापूर पंचक्रोषीत असणाऱ्या पापनाश तिर्थकुंड परिसरातील इंद्रायनीचे प्रथम पुजन मंहत वाकोजी बुवा मंहत हमरोजी बुवा यजमान श्रीव सौ बळवंत कदम तहसिलदार सौदागर सांळुके यांच्या हस्ते करण्यात आले.

पापनाश तिर्थकुंडातीलपविञ कुंभात घेवुन त्याचे जलपुजन करण्यात येवुन जलकुंभ व श्रीप्रतिमा सजविण्यात आलेल्या रथ वाहनावर ठेवण्यात आली.या जलयाञेत मोजक्याच कुमारीका व सुवासनी जलकुंभडोक्यावर घेवुन त्यात आंब्याचे पाने व श्रीफळ असलेला जलयाञेत सहभागी झाल्या होत्या .

ही जलयाञा पारंपारिक वाद्याचा गजरात शहरातील प्रमुख रस्त्यावरून छञपती शिवाजी महाराज पुतळा भवानी रोड वरुन वाजतगाजत श्रीतुळजाभवानी मंदीरात दाखल झाल्यानंतर जलयाञेतील कुमारीका सुवासनी यांनी डोक्यावरुन आणलेल्या पविञ जलाने श्रीतुळजाभवानी मंदीराचा मुख्य गाभारा मंहत तुकोजी बुवा व त्यांचे शिष्य वाकोजी यांनी धुवुन स्वछ केला नंतर यातील सहभागी कुमारीका सुवासनींची श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानचा वतीने हळदीकुंकु लावुन खणनारळाने ओटी भरुन त्यांचा यथोचित्त सन्मान करण्यात आला.

त्यानंतर श्रीतुळजाभवानी मातेस शुध्द स्नान घालुन दुग्धआभिषेक घालुन सिंहासन महाअभिषेक पाच पुजा करण्यात आल्यानंतर नंतर वस्ञोलंकार घालण्यात येवुन देवीची सिंहासनावर शेषशाही अलंकार महापुजा मांडण्यात आली .नंतर नित्योपचार पूजा करण्यात आली.राञी श्रीतुळजाभवानी मंदिर परिसरात देवीचा छबिना काढण्यात आल्यानंतर प्रक्षाळपुजा होवुन शाकंभरी नवराञोत्सवातील पाचव्या माळेचे धार्मिक विधीची सांगता झाली.

महत्वाच्या बातम्या