महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

mahatama gandhi

राजसमंद: पुतळ्याची विटंबना करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा भागात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

रात्री अज्ञात व्यक्तींनी महात्मा गांधींच्या पुतळ्याचे शीर धडावेगळे करुन ते कचऱ्यात टाकले. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार रात्री एकच्या सुमारास चार-पाच जण परिसरात फिरत होते. त्यांनीच हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आरोपी लवकर पकडले न गेल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.