मुंबई : बीसीसीआयची स्पर्धा इंडियन प्रिमीयर लिग ही मीलीयन डॉलर बेबी म्हणून ओळखली जाते. जगभरात तुफान लोकप्रीय झालेल्या आयपीएल स्पर्धेची वाट क्रिकेट रसिक आतुरतेने वाट बघत आसतात. आयपीएलच्या धर्तीवर इतर देशांनीही त्याच्या प्रिमीअर लीग सुरु केल्या.
याचाच एक भाग म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान सुपर लिग ही टी-२० स्पर्धा सुरु केली. यादरम्यान पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज वहाब रियाज याने आयपीएलची स्तुती करत स्वत:च्या देशातील पीसीएल स्पर्धेला घरचा आहेर दिला आहे. तो म्हणाला की,’पीसीएलसह जगातील इतर कोणतीही लिग आयपीएलसोबत स्पर्धा करु शकत नाही. आयपीएल मध्ये जगातील सर्वेत्कृष्ट खेळाडु खेळतात’ असे म्हणाला. यापुर्वी अनेक पाकिस्तानच्या खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेचे कौतुक केले आहे.
वहाब रियाजने त्याच्या यु ट्युब चॅनेलवर ही गोष्ट शेअर केली आहे. यात तो पुढे असं म्हणाला पीसीएलची तुलना आयपीएलशी होउ शकत नाही. कारण आयपीएलचा दर्जा हा खुप उच्च आहे. आयपीएलमधील प्रत्येक गोष्ट ही दर्जेदार असते. प्रत्येक संघासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक नेमले जातात. मात्र पुढे बोलताना वहाबने आयपीएल स्पर्धेनंतर पीसीएल स्पर्धेचे कौतुक केले आहे. तो म्हणाला की आयपीएल स्पर्धेनंतर दुसऱ्या क्रमांकाची स्पर्धा ही पीएसएल आहे. २००८ साली झालेल्या आयपीएल स्पर्धेनंतर भारत पाकिस्तान दरम्यान असलेल्या राजकीय सबंधामुळे पाकिस्तानी खेळाडूना आयपीएल स्पर्धेत संधी दिली जात नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- मंत्रालयात स्वतः उपस्थित राहून अजितदादा ठेवत आहेत वादळ परिस्थितीवर बारकाईने लक्ष
- पेट्रोलसह खतांच्या किंमती वाढल्या, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार
- गेल्या दहा वर्षात भारतीय महिला संघाला लाभले १० प्रशिक्षक; प्रत्येक वर्षी नविन प्रशिक्षकाची निवड
- इंग्लंडला जोरदार झटका ; जोफ्रा आर्चर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर
- तौक्ते चक्रीवादळाचा महावितरणला तडाखा,अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणची कसरत