शरद पवार यांची राज ठाकरे घेणार असलेली मुलाखत पुन्हा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली

भीमा कोरेगाव प्रकरणामुळे आयोजकांनी घेतला आहे निर्णय

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राज ठाकरे घेणार असलेली बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मुलाखत पुन्हा एकदा रद्द झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल तणावाच वातावरण या सर्व गोष्टींच्या अनुशंगाने आयोजकांनी ही मुलाखत पुढे ढकलली आहे. याआधी ३ जानेवारी रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले मात्र त्यावेळेस देखील तारीख बदलून ६ जानेवारी करण्यात आली होती. पण अखेरीस ही तारीख देखील रद्द करण्यात आली आहे. सध्या तरी अनिश्चित काळासाठी ही मुलाखत रद्द करण्यात आली असल्याची माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी दिली आहे.

त्यामुळे आता ही मुलाखत कधी होणार हे माहिती नसल्याने अनेकजण हिरमुसले आहेत. या प्रखर मुलाखतीमधून पवारांचे अनेक नवे पैलू उलगडणार होते मात्र आत यासाठी अजून काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.