पुण्यात लवकरच ”ऊर्जा आणि भविष्यकालीन स्मार्ट सिटीस आंतरराष्ट्रीय परिषद सुरु होणार

टीम महाराष्ट्र देशा : १८ ते २० डिसेंबर २०१९ दरम्यान ”ऊर्जा आणि भविष्यकालीन स्मार्ट सिटीस या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद सुरु होणार आहे. ही परिषद एमआयटी लोणी काळभोर येथे आयोजित करण्यात येणार आहे. शाश्वत ऊर्जा आणि शहरांशी संबंधित समस्यांवर अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे. ईसीएएम-ईपीएमआय, सेर्गी-पोंटॉइस (फ्रान्स), लॉरेन विद्यापीठ (फ्रान्स), क्वीन्स युनिव्हर्सिटी (कॅनडा) आणि एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद सुरु होईल.

या परिषदेसाठी नोबेल पारितोषिक विजेते प्रो. जेफ्री लेव्हरमोर, टेरीचे संचालक राजेंद्र शेंडे, एमआयटी ग्रुप आऑफ इन्स्टीट्युशनचे संस्थापक अध्यक्क्ष प्रा. डॉ. विश्वनाथ. दा. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्क्ष प्रा. डॉ मंगेश कराड यांची प्रमुख उपस्थति राहील. प्रो. जेफ्री लेव्हरमोर यांच्या हस्ते १८ डिसेंबरला सकाळी १०:०० वाजता परिषदेचं उदघाटन होणार आहे. अशी माहिती एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुढे पत्रकार परिषदेत डॉ. सुनील राय म्हणाले, पर्यावरणपुरक ऊर्जा निर्मिती ही काळाजी गरज आहे. भाविष्यातील पिढींसाठी स्वच्छ पर्यावरण निर्माण करून त्यांना शाश्वत विकासाची हमी देण्यासाठी प्रयत्न होणे गरजे आहे. वाढत्या लोकसंख्येवर मात करत आवाढव्य वाढणाऱ्या शहरांवर आळा घालून त्यांना स्मार्ट शहरांची निर्मिती करावी लागणार आहे. यासाठी ही परिषद महत्वाची ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या